चिपळूण/ओंकार रेळेकर:-गुहागर तालुक्यातील सुयश कॉम्प्युटर्स सेंटरचे मालक संदेश साळवी यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एमकेसीएलच्या एमएससीआयटी सेंटरच्या वार्षीक सर्व साधारण सभेत व्यवस्थापकीय संचालक विणा कामत यांच्या हस्ते एमएससीआयटी बेस्ट परफॉर्मींग पुरस्काराने रत्नागिरी येथे गौरविण्यात आले.
सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोली तर्फे गुहागर तालुकास्तरीय विवीध शिबीरांचे आयोजन , इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेचे मार्गदर्शन कार्यक्रम, फ्युचर वेध चाचणी परीक्षा, करियर मार्गदर्शन आणि जॉब प्लेसमेंट सेवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा आणि विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वितरण, स्वातंत्र्यदिनानिमित्त ई -टेस्ट आयोजन,नवीन विद्यार्थ्यांसाठी एम एस सी आय टी वेलकम मोफत कोर्स, महा आयटी जिनीयस परीक्षेचे आयोजन , डिजीटल साक्षरता अभियान , व्यवसाय मार्गदर्शन , आयटीत मराठी मोफत कोर्स उपलब्ध, दहावी – बारावी ऑनलाईन निकाल मोफत प्रत भेट , दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगा टक्के, बक्षीस पक्के अभिनव उपक्रम,विवीध परिक्षांचे ऑनलाईन अर्ज , महिलांसाठी डिजीटल सहेली, शिक्षकांसाठी तंत्रज्ञान साक्षरता अभियान आदी. उपक्रमांचे सातत्याने आयोजन करुन ग्रामीण भागात संगणक साक्षरतेसाठी प्रामूख्याने प्रयत्न केले जातात. ग्रामीण भागात संगणक प्रशिक्षण आणि प्रसार कार्यात २०२३ या वर्षात उल्लेखनीय कामगिरी बाबत विना कामत(Managing Director MKCL) यांच्या हस्ते सुयश कंप्युटर्स, आबलोली या संगणक प्रशिक्षण संस्थेला गौरवण्यात आले. विवीध उपक्रम राबवील्यानेच सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोली यांना गेली १३ वर्षे पुरस्कार मिळत आहे यावेळी एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक संतोष कोलते , कोकण विभाग समन्वयक जयंत भगत , व्यवस्थापकीय संचालक विणा कामत , अमित रानडे , सिंधुदुर्ग जिल्हाप्रमूख प्रणय तेली, अतूल पतौडी , विकास देसाई , नटराज सर, मंगेश सर आदी. मान्यवर उपस्थित होते .या संगणक ज्ञान प्रसाराच्या कार्यात आमच्या सोबत असणारे माझे सर्व सहकारी आणि वेळोवेळी आम्हास सहकार्य करणारे शाळा कॉलेज, आणि आमच्यावर वर्षोनुवर्षे विश्वास ठेवणारे विद्यार्थी आणि पालक वर्ग यांचे आभार सुयश कंम्प्युटर्सचे संचालक श्री. संदेश साळवी यांनी मानले.