रत्नागिरी:-जामिनावर मुक्त झालेल्या बलात्कारातील आरोपीला पीडितेशी संपर्क करणे चांगलेच महागात पडल़े आहे. जामिनावर सुटलेला आरोपी आपल्याशी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपल्याला व मुलीच्या जीवाला धोका निर्माण आहे, अशी तक्रार महिलेकडून दाखल झाल्याने न्यायालयाने आरोपीला दणका दिल़ा आहे. या आरोपीचा जामीन रद्द करत त्याला तत्काळ अटक करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आल़े.
महेश शांताराम बालगुडे असे या आरोपीचे नाव आह़े. रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी जामीन रद्द करण्याचा आदेश दिल़ा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश याच्याविरूद्ध महिलेशी अतिप्रसंग केल्याप्रकरणी भादंवि कलम 376, 376 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा. तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आले होत़े. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्याने आता आपल्याला जामिनावर मुक्त करण्यात यावे, अशी मागणी महेश याच्यावतीने न्यायालयापुढे करण्यात आली होत़ी. त्यानुसार 20 जुलै 2023 रोजी सत्र न्यायालयाकडून महेश याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होत़ी. यावेळी न्यायालयाकडून पीडित महिला व साक्षीदार यांच्याशी संपर्क न करणे अथवा त्यांना धमकावू नये, अशी अट घालण्यात आली होत़ी.
दरम्यान जामिनावर मुक्त होताच आरोपी महेश याने पीडितेला व्हॉटस्ऍपवर मेसेज पाठवले तसेच व्हाईस कॉल करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार पीडितेने पोलिसांत दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांकडून आरोपीचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयापुढे करण्यात आल़ी. खटल्यादरम्यान आरोपीच्यावतीने न्यायालयापुढे सांगितले की, आरोपी याचा लॅपटॉप पीडितेकडे आहे, हा लॅपटॉप परत मिळवण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगण्यात आल़े तर आरोपीचा जामीन रद्द करावा, यासाठी खोटे आरोप केले जात असल्याचेही आरोपीच्यावतीने न्यायालयापुढे सांगण्यात आल़े.
तर सरकारी पक्षाकडून न्यायालयापुढे सांगण्यात आले की, पीडिता ही स्वतंत्र राहत असून तिला एक शाळेत जाणारी मुलगी आह़े. अशाप्रकारे आरोपीने पीडितेशी संपर्क साधल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण होवू शकत़ो. त्यामुळे आरोपीचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आल़ी. न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेत आरोपीचा जामीन रद्द केल़ा तसेच त्याच्या अटकेचे आदेश दिल़े.