जाकादेवी/वार्ताहर :-भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी रात्री १२ वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना रत्नागिरी शहरात उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
बौद्धजन पंचायत समिती तालुका रत्नागिरी व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रत्नागिरी तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते ,सभासद बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ (रत्नागिरी) उपस्थित राहावे ,असे आवाहन दोन्ही शाखांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी संयुक्त समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.यामध्ये संयुक्त समितीचे अध्यक्ष व आयोजक प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष तुषार जाधव, सचिव व्ही बी.मोहिते, नरेंद्र आयरे, सुहास कांबळे, भगवान जाधव,तु.गो.सावंत, विजय आयरे, रत्नदीप कांबळे,शिवराज जाधव ,प्रितम आयरे, विलास कांबळे, मंगेश सावंत, कृष्णा जाधव, दिपक जाधव, दिपक पवार, रविकांत पवार, दिनकर कांबळे,किरण मोहिते यांचा समावेश आहे.