रत्नागिरी:-क्रीडा व युवक संचालनालय, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची जिल्हा क्रीडा परिषद यांनी आयोजित केलेल्या विभागीय शालेय कॅरम स्पर्धेवर रत्नागिरी जिल्ह्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
जिल्हा क्रीडा कार्यालयात ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय कॅरमपटू रियाज अकबरली यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी विशाल बोडके, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते, प्रमुख पंच सागर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात स्वरा सुरेश मोहिरे व १७ वर्षांखालील गटात ओम दिनेश पारकर यांनी विजेतेपद मिळवले. १७ वर्षांखालील मुलींचा गटात गुंजन आशीष खवळे, समीरा सचिन शिंदे व रिया नीलेश वडके यांनी अनुक्रमे दोन, तीन व चार क्रमांक मिळवला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात द्रोण मोहन हजारे, मिझान आदम साटविलकर व सोहम राकेश बुटाला यांनी अनुक्रमे तीन, पाच आणि सहा क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात मधुरा दर्शन देसाई हिने तिसरा क्रमांक मिळवला.
हिंगोली येथे होणाऱ्या राज्य शालेय कॅरम स्पर्धेत कोल्हापूर विभागातर्फे निवड झालेल्या ३६ खेळाडूंपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील १६ खेळाडूंची निवड झाली आहे. निवड झालेले खेळाडू असे – १४ वर्षांखालील मुली १) स्वरा सुरेश मोहिरे २) स्वरा मिलिंद कदम ३) सेजल सुभाष जाधव. १४ वर्षांखालील मुले १) द्रोण मोहन हजारे २) मिझान आदम साटविलकर ३) सोहम राकेश बुटाला. १७ वर्षांखालील मुली १) गुंजन आशीष खवळे २) समीरा सचिन शिंदे ३) रिया निलेश वडके. १७ वर्षांखालील मुले १) ओम दिनेश पारकर २) हर्ष मिथुन शिवगण.
१९ वर्षांखालील मुली १) मधुरा दर्शन देसाई २) श्रावणी विजय कोलगे ३) पायल मंगेश येलये. १९ वर्षांखालील मुले १) अली अब्युस समद पाटणकर २) माज हमीद देसाई.