चिपळूण:-सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी के.एम. अग्रवाल महाविद्यालय, कल्याण येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या निवडणूकी मध्ये श्री अनिल कलकुटकी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
अनिल कलकुटकी यांनी आत्तापर्यंत डीबीजे कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे युनिट प्रमुख म्हणून काम केले असून अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ मुंबईच्या 21 वर्षे उपाध्यक्षपदी कार्यरत होते तसेच महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या कार्यकारणी मध्ये 5 वर्ष रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे.
चिपळूण येथे अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे 28 वे वार्षिक अधिवेशन दिनांक 29 जानेवारी 2006 रोजी संपन्न झाले तसेच डीबीजे महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे 12 वे त्रेवार्षिक अधिवेशन दिनांक 27 व 28 ऑक्टोबर 2018 रोजी संपन्न झाले सदर अधिवेशनास राष्ट्रीय नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित होते. या दोन्ही अधिवेशनाचे संयोजन अनिल कलकुटकी यांनी केले होते. याबद्दल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. मंगेश तांबे,प्राचार्य डॉ.बापटसर नियामक समिती सदस्य , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,मैत्रीग्रुपचे सदस्य या सर्वांनी अभिनंदन केले.उपप्राचार्य डॉ.चांदा ,श्री.संतोष वाघे,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.