महसूल खाते कारवाई करणार का?जनतेची ओरड
संगलट,खेड/प्रतिनिधी:-गेल्या पंधरा दिवसापासून संध्याकाळच्या वेळीस काही स्थानिक लोकांकडून तसेच सावित्री नदी खाडीपट्ट्यातील काही राजकीय लोक महाड तालुक्यातील टोल पासून ते म्हैसला तालुक्यातील आडी व तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याचे उंबरोली या संपूर्ण सावित्री नदीच्या भागात मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू उत्खन होत असल्याचे आरोप जनतेतून जोरदार होत आहे.
संध्याकाळच्या वेळीस महाप्रल आंबेत पुलाखालून वाळू ने चोरट्या भरलेल्या बाजेस सुसाट धावेत आहे त्यामुळे या पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर मंडणगड व रत्नागिरी जिल्ह्याला लागून असलेले रायगड हद्दीमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून सक्शन पंपाच्या माध्यमातून काही ठिकाणी चोरटी वाळू उत्खन होत असल्याची जनतेतून जोरदार ओरड होत आहे असच मंडणगड तालुक्यामध्ये काही ठिकाणी सक्शन पंप लावण्यात आले असल्याची धक्कादायक व पुढे येत आहे पंपाच्या माध्यमातून संध्याकाळी ते पहाटे सहा वाजेपर्यंत सुमारे दीडशे ते दोनशे ब्रास वाळू उत्खनना केली जात असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे शासनाच्या मोठ्या प्रमाणात महसूल पडत आहे यान चोरट्या वाळू उत्खन न करण्याला खतपाणी घालणारे तरी कोण? यांची कसून चौकशी होणे गरजेचे आहे तरी याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे