माहिती अधिकार महासंघाचे सुभाष लांजेकर यांचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन
संगमेश्वर/इकबाल पटेल:-फुणगुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम गेली दोन महिने बंद स्थितीत असून त्याचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. या इमारतीच्या कामात सातत्य नाही तसेच यात गोलमाल असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती देवरुख यांनी सखोल चौकशी करण्याबाबत आर टी आय कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्रचे संगमेश्वर तालुक्याचे सक्रिय कार्यकर्ते सुभाष लांजेकर यांनी निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, काम बंद असल्या बाबत ग्रामसभेत ठराव करण्यांचे ठरले आहे. परंतु आरोग्य केंद्राचे काम लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे. या प्रकरणात योग्य ती कार्यवाही झाली नाही तर महासंघाचे वतीने दिनांक 06 डिसेंबर 23 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी उपोषण करण्यात येईल असा इशारा सुभाष लांजेकर यांनी दिला आहे.
फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीबाबत सखोल चौकशी करा
