सिंधुदुर्ग:-मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या मागील सिंधुदुर्ग दौऱ्यात मनसेची सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्त केल्या नंतर सुमारे एका वर्षाने जिल्ह्याची नवी कार्यकारणी राज ठाकरे यांनी जाहीर केली आहे. कुडाळ मध्ये झालेल्या मनसेच्या बैठकीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या मागच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली होती. त्यानंतर आता सुमारे एक वर्षानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. आज कुडाळ मध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला अविनाश जाधव, शिरिष सावंत, अभिजित पानसे, गजानन राणे, संदीप दळवी आदी मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. धीरज परब यांना पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे कुडाळ आणि मालवण तालुक्यांची जबाबदारी राहील तर दुसरे जिल्ह्याध्यक्ष म्हणून अनिल केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. कणकवली, वैभववाडी, देवगडसाठी कोणाकडे जिल्ह्याध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली नाही. मोनिका फर्नांडिस यांच्याकडे महिला जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. सचिवपदी बाळा पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत चार उपाध्यक्ष असून त्यामध्ये सावंतवाडी, दोडामार्ग साठी सुधीर राऊळ,वेंगुर्ला कुडाळला कुणाल किनळेकर, मालवण-कणकवलीला गणेश वाईरकर आणि देवगड-वैभववाडी साठी चंदन मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुकाध्यक्षांची निवड सुद्धा यावेळी जाहीर करण्यात आली. यामध्ये मिलिंद सावंत (सावंतवाडी), हेमंत जाधव (कुडाळ), प्रीतम गावडे (मालवण), शांताराम सादये (कणकवली), सचिन तावडे (वैभववाडी), संतोष मयेकर (देवगड) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. स्वरा विराज करगुटकर याना देवगडचे महिला तालुकाध्यक्षपद देण्यात आले आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि देवगड विधानसभा सचिवपदी अनुक्रमे गुरुदास गवंडे, सचिन सावंत आणि समीर चिले यांची नियुक्त करण्यात आली आहे. दीपक पार्टे तालुका सचिव वैभववाडी तर पास्कोल रॉड्रिग्ज मालवणचे उपतालुकाध्यक्ष असतील. महेश परब (सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष), अमित नाईक (तालुका संपर्क अध्यक्ष सावंतवाडी) तुषार साटम (कुडाळ विधानसभा संपर्क अध्यक्ष), सत्यवान दळवी (कुडाळ तालुका संपर्क अध्यक्ष), नंदकुमार तळावडेकर (मालवण तालुका संपर्क अध्यक्ष),संतोष शिंगाडे (देवगड विधानसभा संपर्क अध्यक्ष), विमल मयेकर (देवगड तालुका संपर्क अध्यक्ष), चंद्रशेखर सावंत ( वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष), यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. हि निवड वर्षभरासाठी असणार आहे.
परशुराम उपरकर बैठकीला अनुपस्थित !
दरम्यान आजच्या या बैठकीला मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर आणि काही माजी पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्याबद्दल अभिजित पानसे यांना विचारले असता उपरकर आजारी असल्यामुळे उपस्थित नाहीत. पण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजेच परशुराम उपरकर आहेत. आम्ही त्यांची भेट नक्की घेऊ. असे श्री. पानसे यांनी सांगितले.
सिंधुदुर्गात मनसेच्या नव्या नियुक्त्या
