चिपळूण – चिपळूण सिटीजन्स मुव्हमेंट या सामाजिक संस्थेतर्फे ड्रग्स विरोधी जनजागृतीसाठी जानेवारीत महारॅलीचे . आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीमध्ये शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह पालक, नागरिक, शासकीय क अधिकारी व कर्मचारीवर्ग सहभागी होणार आहे. रत्नागिरा जिल्ह्यातील किंबहुना कोकणातील ही सर्वात मोठी रॅली ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ‘से नो टू ड्रग्ज’ या मोहीमेतंर्गत या महारॅलीत अंमली पदार्थांपासून दूर रहा असा संदेश देणार आहे.
चिपळूण शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा प्रसार झालेला आहे व याचे सेवन तरुण पिढी करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चिपळूण सिटीजन्स मुव्हमेंट यांनी एक मोठी चळवळ उभी केली आहे. या चळवळीतून प्रत्येक शाळा व कॉलेजमधून आता जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशासनाला अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे निवेदन देण्यात आले. पोलीसांनीही शहरात अनेक ठीकाणी धाडी टाकून अटकसत्र सुरु केले. शाळा व कॉलेजमध्ये संस्थेचे पदाधिकारी जनजागृती करून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना या संदर्भातील होणारे दूरगामी परिणामाची माहिती देत आहेत. याच मोहीमेचा मोठा उपक्रम म्हणजे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महारॅलीचेआयोजन करण्यात आले आहे.
या महारॅलीमध्ये चिपळूण शहर व परिसरातील बहुतांशी शाळा व कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक, नागरिक व शासकीय अधिकारी कर्मचारीवर्ग ही सहभागी होणार आहेत. ही ही महारॅली चिपळूण शहरातून मार्गाक्रम करत हायवे मार्गे प्रांत कार्यालयासमोर एकत्रित होईल व तिथे स्टेजवर विविध कार्यक्रम सादर करण्यात येतील. यामध्ये ड्रग्ज सेवनाने होणारे दुष्परिणांच्या संदर्भात शालेय विद्यार्थ्याकडून पथनाट्य सादर करण्यात येतील, तसेच ड्रग्जबंदीवर कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत याची माहिती संबंधित शासकीय अधिकारी देतील. चिपळूण सिटीजन्स मुव्हमेंट्सच्या पदाधिकाऱ्यांकडून या मोहीमेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात येईल. या महारॅलीच्या आयोजना अगोदर डिसेंबरमध्ये पोस्टर्स व निबंध स्पर्धाही आयोजित करण्याचा मानस आहे व त्याचेही पारोतोषिक वितरण या ठिकाणी होणार आहे.या रॅलीमध्ये विविध बॅनर्स तसेच ड्रग्स विरोधी अभियानाचे माहितीपत्रक देण्यात येणार आहेत. तसेच या चळवळीचेही बॅनर्स शहरांमध्ये लावण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी ‘से नो टू ड्रग्ज ‘ या मोहिमेत व रॅलीत सहभागी व्हावे व संस्थेकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासा