सिंधुदुर्ग:-जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता या विमानतळावर रात्रीच्या वेळी सुद्धा विमान उतरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लवकरच दिल्ली येथून डीजीसीएचे पथक चिपी येथे येऊन नाईट लँडिंग सुविधेची तपासणी करणार आहे. त्यानन्तरच या सुविधेला अंतिम मंजुरी मिळेल. नाईट लँडिंग उपलब्ध असेल तर फ्लाय-९१ या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने सेवा द्यायला अनुकूलता दर्शविली आहे. यंदाचा नौसेना दिन पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ४ डिसेम्बर रोजी मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाईट लँडिंग सुविधा चिपी विमानतळावर कार्यान्वित करण्यात आली आहे. अशी माहिती विमानतळाच्या प्रशासकीय सूत्रांनी दिली. दरम्यान नाईट लँडिंग सुविधा कार्यान्वित झाल्यामुळे चिपी विमानतळाला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.
चिपी परूळे (ता.वेंगुर्ले) येथील सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावर नाईट लॅण्डींगची यंत्रणा बसविण्यात आली असून लवकरच या विमानतळावरून नाईट लॅण्डींग विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी डीजीसीए कडुन ग्रीन सिग्नल मिळणे अपेक्षित आहे. दि. ४ डिसेंबर या नौसेना दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह महनीय व्यक्ती मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. त्या या पार्श्वभूमीवर ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. फ्लाय-९१ हि विमान कंपनी याठिकाणी विमानसेवा देण्यास सज्ज झाली आहे, अशी माहीती विमानतळ प्रशासनाच्या सुत्रांनी दिली.
दि. ४ डिसेंबर रोजी होणा-या नौसेना दिन कार्यक्रमासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक महनीय व्यक्ती मालवण येथे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग विमानतळावर नाईट लॅण्डींगची सुविधा सुरू करणे महत्त्वाचे होते.अखेर प्रशासकीय पातळीवर याबाबत ठोस निर्णय होवून आवश्यक त्या सुविधा पुर्ण करुन घेण्यासाठी विकासक आयआरबी कंपनीला सक्त सुचना देण्यात आल्या होत्या.
जिल्हाधिकिरी किशोर तावडे यांनी सुध्दा याबाबत प्रत्यक्ष विमानतळाला भेट देऊन कंपनीला सुचना दिल्या होत्या.पालकमंत्री रविंद्र चव्हाण,खा.विनायक राऊत सुध्दा याप्रश्नी पाठपुरावा करत होते. अखेर या विमानतळावर नाईट लॅण्डींगची यंत्रणा बसविण्यात आली आहे. लवकरच दिल्ली येथील डीजीसीएचे पथक या विमानतळावर येऊन नाईट लॅण्डींग सुविधेची तपासणी करून ही सेवा सुरू करण्यास अंतिम मंजूरी देणार आहे. त्यानंतर या विमानतळावर नाईट लॅण्डींग विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे.
सध्या या विमानतळावर दिवसाची विमानसेवा सुरू असून अलायन्स एअर ही एकमेव कंपनी विमानसेवा देत आहे. आता नाईट लॅण्डींगची विमान सेवा देण्यास फ्लाय-९१ या देशातील प्रमुख महत्त्वांच्या शहरांना जोडणारी विमान सेवा देणाऱ्या कंपनीने सिंधुदुर्ग विमानतळावर विमानसेवा देण्यास अनुकूलता दर्शविली आहे. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर या विमानतळावर ७ हेलिपॅड तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती विमानतळ सुत्रांनी दिली. दरम्यान दिड वर्षांनंतर चिपी विमानतळावर नाईट लॅंन्डिगसाठीची यंत्रणा कार्यान्वित झाल्याने डीजीसीएच्या परवानगीनंतर या विमानतळावर रात्रीची विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.