मुंबई/उदय दणदणे:-कोकणात पिढ्यानपिढ्या जोपासलेली नमन लोककला मुंबई रंगमंचावर सादरीकरण व्हावी अशी येथील प्रत्येक मंडळाची इच्छा असते,अशीच इच्छा मनी बाळगत रत्नागिरी जिल्ह्यातील “श्री गजानन महाराज नमन मंडळ” नेवरे लावगणवाडी,तालुका-जिल्हा रत्नागिरी ह्या मंडळाचा मुंबई रंगमंचावर प्रथमच “नमन लोककला” कार्यक्रमाचा शुभारंभ प्रयोग होत असून खास पुरुषप्रधान असलेल्या ह्या नमन कार्यक्रमातून पौराणिक कथा:त्रिपुरासुराचा वध, आकृडाची प्रेक्षकांमधून प्रवेश,कंस वध,अशा विविधरंगी नटलेल्या ह्या कार्यक्रमाचे खास आकर्षण “दशमुखी रावण” नृत्य असणार आहे,त्याचबरोबर काल्पनिक विनोदी वगनाट्य कलाकृती “कालिका मातेला बळी हवाय”…असा हा बहारदार कार्यक्रम शनिवार दिनांक.१८ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्रौ.०८:३० वा. साहित्य संघ नाट्यगृह,चर्नीरोड (गिरगाव) मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
श्री गजानन महाराज नमन मंडळ,नेवरे-लावगणवाडी,तालुका-जिल्हा रत्नागिरी ह्या मंडळाने नमन ही लोककला आजवर अविरत जपली असून,ग्रामीण स्तरावर नमन कार्यक्रमाचे यशस्वी प्रयोग करून रसिकांची मने जिंकली आहेत, मुंबई रंगमंचावर प्रथमच आमच्या मंडळाचा हा नमन लोककला कार्यक्रमाचा शुभारंभ प्रयोग होत असून तमाम कोकण कला प्रेमी रसिकांनी सदर नमन प्रयोगाला बहुसंख्येने उपस्थित राहून आम्हास कोकणची कला संस्कृती जपण्यास उपकृत करावे,अधिक माहितीसाठीमुंबई प्रतिनिधी: विश्र्वास रामाणी-९०२२१८८४३४,सुभाष बांबरकर-९८९२३८४४७१,निलेश लोगडे-९८९२३०५६४६,सचिन लोगडे -९८३३८२०२३३,गावं प्रतिनिधी: योगेश लोगडे-९३५९७६२३२२,प्रसाद लोगडे -७७९८७२२०२५,जितेंद्र लोगडे-९१५८१६०८६२ ह्या प्रतिनिधींकडे संपर्क साधावा असे आवाहन उपरोक्त मंडळाचे वाडी प्रमुख-प्रसाद मधुकर लोगडे यांनी केले आहे.