संगमेश्वर /प्रतिनिधी:-संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथे अंगावर उकळते पाणी पडून उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. ओवी अमर किंजळे (३ वर्षे ) असे मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे. ही घटना शनिवार 11 नोव्हेंबर रोजी रात्री घडली आहे.In Wandri, a child died after hot water fell on his body
Sangmeshwer पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत कु. ओवी अमर किंजळे ही त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आरती अनंत किंजळे हिच्या घरी खेळायला गेली होती. त्यावेळी आरती अनंत किंजळे यांच्या येथे गरम पाणी ओवी हीच्या अंगावर पडल्याने तीचा पायाला मोठ्या जखमा झाल्या होत्या. तिला तात्काळ नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र वांद्री येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक औषध उपचार करून घरी सोडण्यात आले. त्यानंतर तीची तब्येत जास्त बिघडल्याने तिला निर्मल बाल रुणालय साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे औषधोपचाराकरीता दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचाराकरीता जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यास सांगितले. मात्र सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी औषधोपचारापूर्वीच ओवीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.In Wandri, a child died after hot water fell on his body
या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक तपास Sangmeshwer संगमेश्वर पोलीस ठाण्याचे राजेश शेलार तपास करीत आहेत.In Wandri, a child died after hot water fell on his body