रत्नागिरी/ उदय दणदणे:-महाराष्ट्रातील आज अनेक लोककला लोप पावत असताना कोकणातील कलगी तुरा (जाखडी नृत्य) लोककला जोपासण्यासाठी अनेक शाहिरी लोककलावंत प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, कलाकारांच्या ह्या प्रयत्नांना अधिक बळ प्राप्त व्हावे,कलगी तुरा लोककलेचे जतन संवर्धन बरोबरच कलाकारांचा सन्मान व्हावा यासाठी कलाकारांची मातृसंस्था कलगी तुरा समाज उन्नती मंडळ,मुंबई (रजि.)ह्या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी विविध उपक्रम राबविले जातात, सदर संस्थेच्या वतीने रत्नागिरी जिल्हास्तरीय गौरी गणेश नृत्य स्पर्धा -२०२३ -२४ चे आयोजन करण्यात आले असून, शनिवार, दिनांक २५ नोव्हेंबर२०२३ रोजी सर्व साक्षी हॉल,(खंडाळा) मु.पो.वाटद ,ता.जि-रत्नागिरी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ह्या स्पर्धा सायंकाळी ४ वा.संपन्न होणार आहेत.
संस्थेच्या नियोजन प्रमाणे प्रथम क्रमांक विजेताला ११०००/- द्वितीय क्रमांक विजेताला-७००० /- व तृतीय क्रमांक विजेताला-५०००/- त्याचबरोबर आकर्षक स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, तसेच उत्कृष्ट गायक पारितोषिक -करा ओके माईक, तर उत्कृष्ट ढोलकी वादक विजेताला -ढोलकी,त्याचबरोबर सहभागी कलापथक यांना ढोलकी व सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे,तर सदर स्पर्धेकरीता एकूण १३ नृत्य कला पथकांनी यशस्वी नोंदणी केली असल्याची महत्वपूर्ण माहिती उपरोक्त संस्थेचे सचिव संतोष धारशे, सहसचिव सुधाकर मास्कर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.