उद्धव ठाकरे गटाचा पराभव
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा खरेदी -विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक (सन -२०२३-२८) शनिवारी घेण्यात आली. या निवडणूकीत सहकार पॅनेलचे तिनीही उमेदवार अविनाश जाधव, सुभाष जाधव, अरविंद डोर्लेकर निवडून आले.
सहाकर पॅनेलने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पराभव करत विजय संपादन केला. पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलचे प्रमुख तानाजीराव चोरगे व बाबाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन उर्फ आबा पाटील, रामभाऊ गराटे, संजय खापले (चिपळूण) व विविध कार्यकारी सोसायटी सचिव यांच्या सहकार्याने विजय मिळविला. विजयी उमेदवारांनी पालकमंत्री सामंत यांची भेट घेतली त्यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्हा खरेदी विक्री संघाची निवडणूकीसाठी एकूण १४ जागा निवडायच्या होत्या. ११ जागा बिनविरोध यापूर्वीच निवडून आल्या होत्या. तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.
रत्नागिरी जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत सहकार पॅनेलचे वर्चस्व
