11 शिक्षकांपैकी तब्बल आठ पदे रिक्त
रत्नागिरी:-रत्नागिरीतील शासकीय बी. फार्मसी महाविद्यालयात शिक्षकांची अकरा पदे मंजूर असून त्यापैकी तीनच शिक्षक कार्यरत आहेत.उर्वरित आठ पदे रिक्त असल्याने तीनच शिक्षक महाविद्यालय चालवत आहेत.त्यामुळे महाविद्यालयातील 200 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
अशावेळी शासनाने त्वरीत शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संकेत कदम, तसेच फार्मसी कॉलेज मधील विद्यार्थी आबिद काझी, शुभंकर भावे, अनुज पवार, श्रावणी कुबल, इरीन सागु, योगीराज खातु, ओमकार खालगे, हर्षदा गावकर, शिवानी जगताप, निवेदिता चव्हाण, स्नेहा घारे उपस्थित होते. शिक्षकांची आठ पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच महाविद्यालय प्रशासनावर ताण येत आहे.