दोघांवर गुन्हा
संगलट,खेड/ प्रतिनिधी:-खेड तालुक्यातील आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वेस्टेेशन येथील वेरळ फाटा या ठिकाणी सावंतवाडी येथुन महाडच्या दिशेने जाणारा टेंम्पो नंबर एमएच 46 BU 8164 या मधुन विमल गुटखा विनापरवाना वहातुक केल्याप्रकरणी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक भोसले, पोलीस गाडीचा चालक दिनेश कोतकर, पोलीस मित्र भालेकर यांच्या पथकाने शनिवार दि. 4/11/2023 रात्री 11.00 वाजल्यापासून ते दि. 5/11/2023 रोजी पहाटे 04.30 वाजताच्या मुदतीत पोलीसांची गस्त घालत असताना वाहनाची तपासणी करीत असताना तपासणीत विमल नावाचा तंबाखूजन्य गुटख्याची सुमारे 20 पोती असा एकुण अंदाजे 15 ते 20 लाखाचा मुद्देमालासह टेंम्पो पोलीसांंनी जप्त करून दोघांवर येथील पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
खेड तालुक्यात अवैध व बेकायदेशीर व्यावसाय, गंजाचा व्यावसायाविरोधात पोलीसांची जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुळकर्णी यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम राबविण्यात आली असुन तंबाखूजन्य गुटख्याची विक्री करण्यावर शासनाच्या अन्न भेसळ विभागाने बंदी घातलेली असताना सावंतवाडी येथुन वर नमुद टेंम्पोमध्ये वर नमुद किंमतीचा विमल नावाचा तंबाखूजन्य गुटखाजन्य गुटख्याचा माल भरुन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सावंतवाडी ते महाड या मार्गावर वहातुक करीत असताना पोलीसांची रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालत असताना वर नमुद नंबरचा टेंम्पो खेड रेल्वेस्थानकाजवळील वेरळ फाटा येथे सदरच्या टेंम्पोची झडती घेतली असता, वर नमुद किंमतीचा व विमल नावाच्या गुटख्याची पोती, पोलीस गस्त घालत असताना वर नमुद नंबरचा टेंम्पो खेड रेल्वेस्थानकाजवळील वेरळ फाटा येथे सदरच्या टेंम्पोची झडती घेतली असता, वर नमुद किंमतीचा व विमल नावाच्या गुटख्याची पोती, पिशव्या आढळुन आल्याने वर नमुद किंमतीचा मुद्देमाल व टेंम्पो पोलीसांनी जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुटखा कोणाचा आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत. तर खेड मधील व्यक्तिचा असल्याचा संशय व्यक्त होत आहे.