चिपळूण प्रतिनिधी/तालुक्यातील गेली २८ वर्ष विविध क्षेत्रात कार्यरत असलेली खेरशेत येथील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या कौटुंबिक संस्थेच्या वतीने अश्विनी पौर्णिमेच्या वर्षावास सांगता समारोहाच्या निमित्ताने ‘ विश्वशांती सामूहिक महा बुद्ध पूजा पठन संस्कार समारंभ २०२३ शीर्षकांतर्गत या आगळ्या वेगळ्या संस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज विश्वातल्या विनाशाला कारणीभूत असलेल्या विविध समस्यांमुळे पृथ्वीचा विनाश जवळ येऊन ठेवला आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनात भय , असुरक्षितता,चिंता , दुःख, वेदना यांचे थैमान माजले आहे. वस्तुतः लोकांच्या मानसिकतेत,व्यवहारात आणि विचार प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणल्याशिवाय जग हे दुःख( विनाश )मुक्त होऊ शकत नाही. म्हणूनच भगवान बुद्धांची मूलभूत शिकवण मैत्री आणि करुणा, दया, क्षमा ,शांती व अहिंसा या तत्त्वाचा प्रचार करणाऱ्या बहुजन हिताय बहुजन सुखाय किंवा सब्बे सत्ता सुखी होन्तु अथवा भवतु सब्ब
मंगलम् या बुद्ध शिकवणीची आज जगाला नितांत गरज आहे. याकरिता अर्हत सम्यक सम्बुद्ध तथागतांच्या धम्म नीती मार्गाने शरण जाऊन विश्वशांती, मानव कल्याणाची, समस्त प्राणी मात्र सुखी होवो अशी भावना अशोका विजयादशमीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने विशेषतः अश्विनी पौर्णिमेच्या वर्षावास सांगता समारोहाच्या निमित्ताने चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या वतीने तसेच चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती,गावशाखा: खेरशेत व धम्मभूषण विकास संघ खेरशेत, मुंबई (रजि). या संघटनेच्या सहकार्याने रविवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी तक्षशिला बुद्ध विहार, खेरशेत येथे सकाळी १०.३० वाजता विश्वशांती सामूहिक महा बुद्धपूजा पठन संस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
चिपळूण तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक/ उपासिका, बौद्धाचार्य, धम्ममित्र, धम्मचारी यांनी संस्कार समारंभाला सब्बे सत्ता सुखी होन्तु अशा मंगल मैत्रीपूर्ण भावनेने समर्पित होण्याकरिता पांढऱ्याशुभ्र वस्त्रानिशी उपस्थित रहावे. प्रत्यक्ष उपस्थितीत असलेल्या प्रत्येक साधकांना मान्यवर जेष्ठ श्रेष्ठांच्या हस्ते कृतज्ञता पूर्वक’ विश्वशांती सामूहिक महा बुद्ध पूजा पठण संस्कार समारंभ 2023′ सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. याकरिता आपली नोंद धम्मसेविका कु. संघमित्रा संजय कदम (८४५४०९०७५९) व धम्म सेवक कु संघराज संजय कदम (९५११२७३३५५) यांच्याकडे होणे अत्यंत आवश्यक आहे. या संस्कार समारंभाला उपस्थित राहून मंगल मैत्री पूर्ण भावनेने शोभा वाढवावी. असे समारंभाचे आयोजक व संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम कळवित आहे.
खेरशेत येथे ‘विश्वशांती सामूहिक महा बुद्ध पुजा पठन संस्कार समारंभाचे’ आयोजन
