संगमेश्वर/दिनेश आंब्रे:-महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांनी लोकांना भजनाचा ठेवा दिला. संत ज्ञानेश्वर महाराज, संत शिरोमणी तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, संत जनाबाई असे थोर संत या पवित्र अश्या भारत भूमीवर विशेषतः महाराष्ट्राच्या पुण्य भूमीत होऊन गेले.या थोर साधूसंतांनी महाराष्ट्रातील जनतेला सुखाचा ठेवा म्हणून भक्तीची परंपरा बहाल केली. नववीधा भक्ती मधील एक भक्ती म्हणजे भजन तसेंच गायन व वादन होय ही कला परंपरागत कोकणात घरोघरी वयक्तिक भजन, सामूहिक भजन,हार्मोनियम टाळ, वादन, तबला वादन, मृदूंग, बासरी आदी वाद्य गायन स्वरूपात साथसंगत गायले जाते.
सध्या संगमेश्वर नावडी (भंडारवाडा)येथील बाल गायिका अक्षरा महेश सुर्वे (वय 5वर्ष)रामपेठ अंगणवाडी येथे शिकत असून वयाच्या ४थ्या वर्षांपासून भजने गात आहे.
तीला घरी गाणी गुणगुणाची सवय आहे यातूनच तिला अभंग म्हणायची आवड निर्माण झाली असे तिची आई सौ. मिताली महेश सुर्वे (बिर्जे)सांगतात.तीचे वडील महेश(अप्पा)सुर्वे हे हार्मोनियम वाजवतात. सन२०२२ मध्ये श्रीराम मंदिर रामपेठ येथील मंदिरात अक्षरा हिने भजने गायली तर यंदाच्या वर्षी नावडी निनावी मंदिरात तिने गायन केले आहे तीचे गुरु संगीत अलंकार कु.निहाली अभय गद्रे आहेत. सध्या अक्षरा कु.निहाली यांच्या कडे गायना बरोबर च हार्मोनियम शिकण्याचे धडे घेत आहे. या उगवता तारा गायिकेचे सर्वत्र समाजातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ओंकार प्रदान, शंभो शंभो, गोपाळकृष्ण आदी भावगीतांचा व भक्ती गीतांचा तिच्या गायनात समावेश आहे.