ठाणे:-पत्रकारिता करताना पर्यावरण संवर्धनाच्या बहुमूल्य योगदानासाठी जम्मू- काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या जी.एच.आर.टी. इंडिया (विश्व मानवाधिकार संस्था) आणि एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने पत्रकारिता, पर्यावरण आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशांत रवींद्र सिनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.
ग्लोबल वॉर्मिगच्या पार्श्वभूमीवर जगभरात पर्यावरणाचे महत्व वाढीस लागले असून, जागतिक पातळीवर त्या दृष्टीने वेगवेगळी पावले उचलली जात आहेत. भारतातही त्या बाबतीत निरनिराळे प्रयत्न केले जात असताना, पर्यावरणविषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर हेदेखील तितक्याच तळमळीने पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. त्यांना आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धनासाठी जम्मू -काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या जी.एच.आर.टी. इंडिया (विश्व मानवाधिकार संस्था) एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने प्रशांत सिनकर यांना मानद डॉक्टरेट दिली आहे.
मुंबई ठाणे जिल्हा बरोबर पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण आदिवासी पाड्यातील पाणी आणि पर्यावरण संवर्धनविषयक पत्रकारिता केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. Journalism and environment Science या विषयावर मानद डॉक्टरेट देण्यात आली असल्याची माहिती जी.एच.आर.टी. इंडिया संस्थेचे अध्यक्ष डॉ. एच आर रेहमान यांनी दिली.
याअगोदर प्रशांत सिनकर यांना महाराष्ट्र शासनाचा शि.म.परांजपे पुरस्कार, नेपाळ येथील आंतराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत इको-२०१३ पुरस्कार, भारतरत्न राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार, ठाणे महापालिकेचा ठाणे गुणिजन, ठाणे गौरव, पश्चिम बंगाल येथील भारत सरकारशी सलग्न काम करणाऱ्या नव्या फाऊंडेशनचा
राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान २०२३, हिंदुस्थान न्युज नेटवर्क यांचा नॅशनल आयकॉन, वर्ल्ड अचिवर बुक (आंतरराष्ट्रीय), इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
पत्रकार प्रशांत सिनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान
