सर्व स्पर्धांमध्ये कस्तुरी गुरवची चमकदार कामगिरी
संगमेश्वर:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘स्वच्छता व अहिंसा’ या विषयावरील घोषवाक्य आणि कविता लेखन स्पर्धेचा तसेच ‘माहितीचा अधिकार’ या विषयावरील भित्तीचित्र(पोस्टर मेकिंग) स्पर्धेचा निकाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी जाहीर केला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या विविधांगी स्पर्धेमधील सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी अभिनंदन केले.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:-
घोषवाक्य स्पर्धा: प्रथम-वैभवी बबन चव्हाण
द्वितीय-कस्तुरी महेंद्र गुरव,तृतीय-गौरी महेंद्र सागवेकर.
कविता लेखन स्पर्धा: प्रथम-कस्तुरी महेंद्र गुरव,द्वितीय-उज्वल नागेश गमरे,तृतीय-सिद्धी सिताराम गुरव.
भित्तीचित्र स्पर्धा(पोस्टर मेकिंग):प्रथम- चैत्राली गणेश खामकर, द्वितीय-कस्तुरी महेंद्र गुरव,तृतीय-तृणाली संजय गुरव, उत्तेजनार्थ-आश्विनी विष्णू धामणे.
घोषवाक्य व कविता लेखन स्पर्धेचे परीक्षण प्रा. सानिका भालेकर, तर भित्तीचित्र स्पर्धेचे परीक्षण ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे आणि प्रा. सीमा शेट्ये यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. मयुरेश राणे यांनी मेहनत घेतली.
स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापकांचे तसेच सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी अभिनंदन केले.