चिपळूण:-जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, संजय गांधी योजना समितीची स्थापना चिपळूण येथे करण्यात आली. या समितीची पहिली बैठक तहसीलदारांच्या दालनात घेण्यात आली.
बैठकीत संजय गांधी अनुदान योजनेची ३२ प्रकरणे व श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेची २० प्रकरणे अशी एकूण ५२ प्रकरणे मंजूर करण्यात आली, तर एक प्रकरण नामंजूर करण्यात आले.
समितीचे अध्यक्ष शौकत माखजनकर, सचिव आणि तहसीलदार प्रवीण लोकरे, सदस्य तुकाराम मोहिते, मानसी कदम, महादेव खरात, विकास गुरव, राजन निगडे, अशोक भडवळकर, पेढांबकर आदी सदस्य बैठकीला उपस्थित होते.
चिपळूणला संजय गांधी योजनेची ५२ प्रकरणे मंजूर
