विनायक राऊत यांची पंतप्रधानाकडे मागणी
रत्नागिरी:- महाराष्ट्रात मराठा आणि धनगर समाज आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडत आहे.त्याचा गांभीर्याने विचार करून मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी तात्काळ विशेष अधिवेशन घ्यावे अशी मागणी शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आंदोलन सुरू आहे.डोंगरदऱ्यात राहून पशुपालन करत उदरनिर्वाह करणारा धनगर समाजही आरक्षणासाठी आंदोलन करत आहे.त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी तात्काळ अधिवेशन बोलविण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.