संगलट,खेड/इक्बाल जमादार:-माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे, डीजीस्वास्थ्य फाउंडेशन – टेलीमेडीसीन सेंटर , लोढा वेंचर फाउंडेशन , लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी, कुणबी ऋणानुबंध सेवा संस्था, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९/१०/२०२२ ते २१/१०/२०२२ या कालावधीत मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले .पंचनदी ,बोरीवली,मळे ,दुमदेव ,वणौशी ,आघारी, दाभोळ,कोळथरे , देवके या गावातील ३५० लोकांनी सहभाग शिबिरात नोंदवला.
संदीप कुमार यांनी स्थापन केलेल्या डीजीस्वास्थ्य फाउंडेशनच्या ग्रामीण भागातील जनतेसाठी सेवा पुरवण्याच्या संकल्पनेतून विविध ठिकाणी कार्यरत उच्च विद्या विभूषित, अनुभवी डॉक्टरांकडून विविध आजारांवर योग्य सल्ले व औषधोपचार सुचवण्यात आले. शिबिरासाठी ऑनलाईन उपस्थित असलेले डॉक्टर्स अत्यंत आस्था व आपुलकीने औषध उपचार सुचवित होते. डीजीस्वास्थ्य फाउंडेशनच्या वतीने दिव्यांशु गुप्ता, साथी बिश्वास, शिवानी माळी, ज्योती पाटील हे प्रतिनिधी तर ऑनलाईन सल्ल्यासाठी डॉक्टर रवी लांडगे ,डॉक्टर रूपाली शर्मा, डॉक्टर अर्चना पठारे ,डॉक्टर अनुषा अग्रवाल डॉक्टर लीना सक्सेना व डॉक्टर शिवांगी हे उपस्थित होते.
लोढा वेंचर फाउंडेशन यांची मोबाईल व्हॅन , तपासणी व मोफत औषधे पुरवण्यासाठी फाउंडेशनची टीम पूर्ण वेळ उपस्थित होती त्याकरिता सी एस आर प्रमुख शर्ली मिनेझिस यांचे विशेष सहकार्य लाभले ललित मोहन सतीश गिरी डॉक्टर सुरज राठोड पूर्वी शिगवण व नवनीत कदम हे लोढा वेंचरचे प्रतिनिधी आपुलकीसह शिबिर कालावधीत पूर्णवेळ उपस्थित राहिले शिबिराला त्यांचे अधिकारी जितेंद्र गुप्ता यांनी भेट देऊन शिबिर आयोजनाबद्दल कौतुक केले
कुणबी ऋणानुबंध सेवा संस्था अध्यक्ष महेश पारदुले ,दिनेश आडविलकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले ,त्याच्यामार्फत मोफत बससेवा उपलब्ध करून दिल्यामुळेच मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ मोठ्याप्रमाणात घेतला गेल्याची बाब माझी सहेलीने आवर्जून सांगितली .
शिबिर कालावधीत गुंज फाउंडेशन महाराष्ट्र प्रभारी श्री अविनाश चव्हाण सर व त्यांची रत्नागिरी टीम विजय दुर्गवले मयूर नाक्ती प्रथमेश नाटूस्कर याने विशेष उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.
मोफत औषधे व योग्य सल्ला मिळाल्यामुळे तोही आपल्या गावी त्यामुळे परिसरातून आनंद व्यक्त होत असून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. सागरी पोलीस ठाणे दाभोळचे पाचपुते साहेब यांनी शिबिराला मुद्दाम भेट देऊन दिली व उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या .त्यांच्या शुभहस्ते विविध संस्थांच्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे यांच्यामार्फत भविष्यात देखील असेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतील असे सांगण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र दाभोळ येथून वैभव पंडित ,शुभम बंदरकर, भाटकर ,वराडकर सिस्टर यांनीदेखील सहकार्याचा हात पुढे केला व प्रत्यक्ष रक्तदान शिबिरात आरोग्य केंद्राच्या सर्व स्टाफने भाग घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला . समारोप माजी विद्यार्थी संघामार्फत संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराने झाला .सुमारे 47 दात्यानी रक्तदान केले. संतोष अबगुल यांनी आयोजकांचे ग्रामीण भागातून इतके दाते सहाभागी केल्याबद्दल कौतुक केले .
माझी सहेली मार्फत सर्व संस्था,श्री अनंत कुटरेकर, श्री हरिश्चंद्र कुटरेकर, श्री नाना जावळे,श्री सुंदर राणे , उत्तम येलवे , एकनाथ नाचरे , महेश पारदुले , संतोष अबगुल यांचा सत्कार करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .