रत्नागिरी:-कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरतर्फे वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर येत्या ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत धन्वंतरी रुग्णालयात होणार प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत.
रत्नागिरीतील शिवाजीनगर येथील धन्वन्तरी रुग्णालयात २०१४ साली सुरू झालेल्या कोकणातील पहिल्या अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरमध्ये डॉ. तोरल शिंदे दर महिन्याला मोफत तपासणी शिबिर घेतात. या शिबिरांमध्ये माता आणि पिता होण्यासाठी इच्छुक जोडप्यांना टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची आवश्यकता असल्यास उपलब्ध पर्यायांची माहिती दिली जाते.
या शिबिराचा निपुत्रिक जोडप्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धन्वंतरी रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी (02352) 221282, 355059 किंवा 9527044901 या क्रमांकावर संपर्क साधावा.
रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये ५ नोव्हेंबर रोजी मोफत तपासणी शिबिर
