रत्नागिरी:-येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन पद्धती (Public Financial Management System) या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेला प्राध्यापकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील शिक्षक गुणवत्ता आणि प्रशिक्षण समितीतर्फे ही कार्यशाळा झाली. यावेळी व्यासपीठावर प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, डॉ. विवेक भिडे आणि प्रमुख व्याख्याते म्हणून लांजा महाविद्यालायचे डॉ. के. जी. म्हात्रे उपस्थित होते. प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ. विवेक भिडे यांनी केली. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी ही सिस्टीम कशी चांगल्याप्रकारे वापरता येईल, याबद्दल माहिती दिली.
डॉ. म्हात्रे लांजा महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विभागात कार्यरत आहेत. त्यांनी अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये या सिस्टीमबद्दल माहिती दिली. वेगवेगळे रोल कसे असावेत, व्हेन्डर कसे अॅड करावेत, एखादे पेमेंट कसे करावे यासंदर्भात माहिती दिली. ऑनलाइन असले तरी अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये या गोष्टी कशा पूर्ण करता येतात याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालायचे ८ शिक्षक, ४ शिक्षकेतर कर्मचारी, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ विद्यालयाचे २ शिक्षक आणि एक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सरतेशेवटी डॉ. विवेक भिडे यांनी अशी आशा व्यक्त केली की सर्वजण या सिस्टीमशी नक्की जुळवून घेतील व भविष्यात सर्व पेमेंट्स या पारदर्शक माध्यमातूनच होतील.
रत्नागिरी : सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन पद्धतीविषयी कार्यशाळेला प्रतिसाद
