रत्नागिरी:-मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्थानिक समितीची विद्यार्थी निवडणूक पार पाडली. यामध्ये कुणाल श्रीकांत कवठेकर सचिव पदी निवडून आला.
विद्यार्थी विकासाच्या प्रक्रियेमधील विद्यार्थिनी निवडणूक हा महत्त्वाचा भाग असतो यातून विद्यार्थी नेतृत्व गुण विकसित व्हावे म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी स्वायत्त आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीचा स्वीकार केल्यानंतर पहिलीच विद्यार्थी निवडणूक आहे. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होण्यासाठी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी आणि प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखरकर यांनी विद्यार्थी निवडणूक व्हावी अशी भूमिका घेतली त्यानंतर निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. आनंद आंबेकर , डॉ. सीमा कदम प्रा. अंकित सुर्वे यांनी या प्रक्रियेला मूर्त रूप दिले 37 विद्यार्थी प्रतिनिधी यांची निवड झाल्यानंतर आर्या जोगळेकर ,कौशल मोहिते आणि कुणाल कवठेकर विद्यार्थी सचिव पदासाठी उमेदवार म्हणून उभे होते.
कुणाल कवठेकर सचिव पदी निवड झाल्याबद्दल प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुळकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर,
कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.