मनसेच्यावतीने गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन
उदय दणदणे:-गुहागर तालुक्यातील मौजे तवसाळ येथील मोडकळीस येत असलेल्या शाळेच्या ईमारतीबाबत गुहागर मनसेच्या वतीने दिनांक-२६ ऑक्टोबर २०२३ रोजी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर संघटनेच्या वतीने आपणास कळविणेत येते की,किंबहुना आपल्या निदर्शनास आणून देतो कि,मौजे तवसाळ गावातील जि. प. आदर्श शाळा तवसाळ (बाबरवाडी) या शाळेची इमारतीची अवस्था अतिशय बिकट आणि मोडकळीस व दुर्घटनाग्रस्त बनली आहे.सदर ईमारत कधीही कोसळू शकते अशी या इमारतीची स्थिती आहे, त्यामुळे येथे शिकणा-या विद्यार्थ्यांच्या जिवाला मोठया प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. शाळेतील विद्यार्थी जिव मुठीत घेऊन विदयार्जन करीत आहेत.तिच परिस्थिती शिक्षकांचीही आहे.तरी आपण प्रत्यक्षात या जागी जावून पाहणी करावी व लवकरात लवकर या इमारतीची दुरुस्ती करावी.
अन्यथा आम्हा संघटनेला यामध्ये गांर्भियाने लक्ष घालावे लागेल. येत्या पंधरा दिवसात आपण कारवाई न केल्यास पुढील होणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. पुढील होणा-या परिणामास आपण जबाबदार असाल. याची नोंद घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.वरील निवेदनाचा आपला याबाबतचा अभिप्राय किंवा प्रतिक्रीया मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.यावेळी निवेदन देताना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर,तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर,बाबरवाडी अध्यक्ष संदिप जोशी,प्रशांत साटले,यश जाधव,सुशील कदम,सचिन येद्रे, अविनाश नाचरे,चंद्रकांत येद्रे,संतोष येद्रे, आदी कार्यकर्ते,ग्रामस्थ होते.