एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशन आणि रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे आयोजन
शृंगारतळी:- एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशन आणि रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांनी संयुक्त विद्यमाने जागतिक ओझोन दिनी (१६ सप्टेंबर) आयोजित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षकांसाठीच्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, पर्यावरणपूरक नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहोळ्याचे आयोजन रविवार, २९ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११ वाजता गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (ग्रामपंचायत पाटपन्हाळे) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुहागरच्या तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीमती प्रतिभा वराळे, पंचायत समिती गुहागरचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गावणकर, मुख्याध्यापक संघ गुहागरचे अध्यक्ष मंगेश गोरीवले, फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट शृंगारतळीचे शब्बीर बोट, प्रसिद्ध लेखक आणि कोकण पर्यटन व पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर, एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशनचे ट्रस्टी रामचंद्र दळवी (आबा), श्रीमती सीता दळवी आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
जिल्हा विज्ञान मंडळाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सुदेश कदम, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी उपाध्यक्ष हेमंत पाकळे, संघमित्रा कुरतडकर, सचिव श्रीधर जोशी, सहसचिव आनंद खांडेकर, कार्यवाह प्रभाकर सनगरे, सल्लागार अब्दुल मणियार, राजेश गोसावी, रविंद्र इनामदार, हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे.