रत्नागिरी:-तालुक्यातील साखरतर रेहमत मोहल्ला येथे गाडी पार्प करण्यावरून झालेल्या वादातून तरूणाला मारहाण करण्यात आल़ी ही घटना सोमवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडल़ी या पकरणी रत्नागिरी शहर पोलिसांत दोघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल़ा
अस्लम महम्मद बारगीर व सुफियान अस्लम बारगीर (ऱा दोन्ही साखरतर मोहल्ला) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरतर रेहमत मोहल्ला येथे 23 ऑक्टोबर 2023 रोजी गाडी उभी करण्यावरून तकारदार यांचे पती शाहरूख व संशयित आरोपी यांच्यात वाद झाल़ा हा विकोपाला जावून संशयितांनी शाहरूख यांना लोखंडी सळईने मारहाण केली, अशी तकार शहर पोलिसांत दाखल करण्यात आल़ी
त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरूद्ध भादंवि कलम 324,323,504 सह 34 नुसार गुन्हा दाखल केल़ा