पाचल प्रतिनिधी:-राजापूर तालुक्यातील खडी कोळवण गावात डुकरांनी नागेश बने यांच्या भातशेतीचे नुकसान केले आहे. गावात बिबट्या, डुक्कर यांसारख्या जंगली श्वापदांचा वावर जाणवतो. भात कापणी तोंडावर आली असतानाच शेतकऱ्यांना या संकटाना समोर जावं लागतं आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसून तयार झालेलं संपूर्ण शेत डुकरांनी तुडवल्यामुळे उभं पिकं जमिनीवर पडलं आहे. त्यामुळे भात कापणी देखील कठीण झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तसेच प्राणांच्या वावरामुळे गावातही भीतीचे वातावरण आहे. या प्राणांकडून माणसांवरही हल्ला होण्याची भीती आहे तरी वन विभागाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी इथल्या स्थानिकांनी आणि ग्रामपंचायतीने केली आहे.