रत्नागिरी:-रत्नागिरी दैवज्ञ हितवर्धक समाज आयोजित दुसऱ्या जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अकबरअलीला दुहेरी मुकुट मिळाला.
रत्नागिरी जिल्हा कॅरस असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा दैवज्ञ भवनात पार पडली.
स्पर्धेच्या उद्घाटनाला तसेच बक्षीस समारंभाला दैवज्ञ हितवर्धक समाजाचे अध्यक्ष संतोष भुर्के, उपाध्यक्ष सुहास वीरकर, सरचिटणीस धनेश रायकर, खजिनदार हृषिकेष वीरकर, कार्याध्यक्ष संतोष खेडेकर, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, कार्यवाह मिलिंद साप्ते, सदस्य विनय गांगण, स्पर्धा प्रमुख सचिन बंदरकर, प्रमुख पंच साईप्रकाश कानिटकर, सागर कुलकर्णी उपस्थित होते. स्पर्धेच्या बक्षीस समारंभालाही मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल असा –
पुरुष एकेरी
अंतिम फेरी : रियाज अकबरअली विजयी विरुद्ध अभिषेक चव्हाण (२५.९२,२५.०९)
उपान्त्य फेरी : १. रियाज अकबरअली विजयी विरुद्ध योगेश कोंडविलकर (२०.१५,९४.९९,२५.११)
२. अभिषेक चव्हाण विजयी विरुद्ध राहुल भस्मे (९८.२५,२५.१०,२५.१९)
पुरुष दुहेरी
अंतिम फेरी : रियाज अकबरअली/ अभिषेक चव्हाण विजयी विरुद्ध राहुल भस्मे/ दत्ताराम वासावे (२५.९८,२५.०५)
उपान्त्य फेरी : १. रियाज अकबरअली / अभिषेक चव्हाण विजयी विरुद्ध विजय कोंडविलकर/ यश कदम (२५.०४,२५.०९)
२. राहल भस्मे /दत्ताराम वासावे विजयी विरुद्ध राहुल बर्वे/नितिन लिमये (२५.०९,२५.१३)
महिला गट एकेरी
अंतिम फेरी : समीरा शिंदे विजयी विरुद्ध रिया वडके (२५.००,२०.००)
उपान्त्य फेरी : १. समीरा शिंदे विजयी विरुद्ध देविका मोरे (२२.०१)
२. रिया वडके विजयी विरुद्ध मृगजा जुवेकर (२५.०५)
कुमार गट एकेरी
अंतिम फेरी : ओम पारकर विजयी विरुद्ध रोहन शिंदे (२५.००,२०.०६)
उपान्त्य फेरी : १. ओम पारकर विजयी विरुद्ध सन्मान कुवळेकर (२५.००,२५.००)
किशोर गट एकेरी
अंतिम फेरी : द्रोण हजारे विजयी विरुद्ध स्मित कदम (०८.२५,०६.०४,२५.९३)
उपान्त्य फेरी : १. द्रोण हजारे विजयी विरुद्ध हर्ष कदम (११.०६,२१.०२)
२. स्मित कदम विजयी विरुद्ध भुषण सावंत (९७.०२,२०.१९)
किशोरी गट एकेरी
अंतिम फेरी : स्वरा मोहिरे विजयी विरुद्ध स्वरा कदम (१६.००,२१.०४)
उपान्त्य फेरी : १. स्वरा मोहिरे विजयी विरुद्ध निधी सप्रे (९४.१०)
२. स्वरा कदम विजयी विरुद्ध सेजल जाधव (१८.०६)
स्पर्धेत प्रमुख पंच म्हणुन राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर आणि राज्यस्तरीय पंचसागर कुलकर्णी यांनी काम पाहिले. स्पर्धेत ३ ब्रेक टू फिनिशची नोंद झाली. त्यापैकी दोन ब्रेक टू फिनिश देवरूखच्या राहुल भस्मे व एक रत्नागिरीच्या रियाज अकबरअली यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रियाज अकबरअलीला दुहेरी मुकुट
