रत्नागिरी:-उद्योगिनी फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत येत्या २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत दीपोत्सव प्रदर्शन भरणार आहे.
रत्नागिरीत पऱ्याच्या आळीतील गुरुकृपा मंगल कार्यालयात हे प्रदर्शन भरणार असून प्रदर्शनाचे उद्घाटन २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता फाउंडेशनच्या अध्यक्ष सोनल भोसेकर यांच्या हस्ते होईल.
यावेळी कायदे सल्लागार ॲड. प्रिया लोवलेकर, इन्फिगो आय हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रतिभा प्रभुदेसाई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभाला तसेच तिन्ही दिवशी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत खुले राहणार असलेल्या या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन पुणे रिजन झोनल हेड संगीता जोशी, पीआरओ स्नेहा जोशी, फाउंडेशनच्या रत्नागिरी चॅप्टर हेड रश्मी प्रभुदेसाई, सचिव पल्लवी मेहेंदळे, सहसचिव विश्वनाथ केळकर यांनी केले आहे.
उद्योगिनी फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत शुक्रवारपासून दीपोत्सव प्रदर्शन
