राजापूर:- तालुक्यातील नाटे येथे नाटे एसटी स्टँड आणि गणेश नगर या ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
नाटे येथील रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने जय भवानी रिक्षा स्टॅन्ड असे नामकरण करत दोन ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड तयार करण्यात आला असून ग्रामपंचायत आणि रत्नागिरी विभाग परिवहन अधिकाऱ्यांच्या परवानगीने या अधिकृत रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन करत असल्याचे रिक्षा संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
नाटे एसटी स्टँड परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून नाटे सरपंच संदीप बांदकर, साखरे नाटे सरपंच श्रीमती गुलजार ठाकूर, सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी, मच्छीमार नेते अमजद बोरकर, नाटे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत मिराशी, आंबोळगड चे उपसरपंच राजाराम पारकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश लांजेकर, शिव संघर्ष संघटनेचे अध्यक्ष आणि विघ्नेश मोटार ट्रेनिंग स्कूलचे संचालक मनोज आडवीरकर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रसाद मोदी, ग्रामपंचायत सदस्य निलेश बांदकर, माजी सरपंच योगिता बांदकर पत्रकार राजन लाड ,शाखाप्रमुख सचिन बांदकर, सचिन कोठारकर ,प्रविण पटेल, महेश कोठारकर आदींसह मान्यवर , ग्रामस्थ आणि रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कायद्याच्या चौकटीत राहून आणि परिवहन विभागाच्या नियमानुसार व्यवसाय करणाऱ्या सर्वांना आपले सहकार्य राहील असे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारी यांनी स्पष्ट केले
तर व्यवसाय करत असतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचे ही काम रिक्षा चालक-मालकानी करावे असे आवाहन अमजदभाई बोरकर यांनी केले.
नाटे बाजारपेठेत होणारे ट्राफिक आणि वाहनचालकांचा अस्ताव्यस्तपणा कमी होण्यास या रिक्षा स्टॅन्ड मुळे मदत होईल अशी अपेक्षा सरपंच संदिप बांदकर यांनी व्यक्त केली.
नाटे भागात झालेले हे राजापूर तालुक्यातील पहिले अधिकृत रिक्षा स्टॅन्ड असल्याचे रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या रिक्षा स्टॅन्ड साठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे रिक्षा संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अनिल ठाकरे, उपाध्यक्ष परेश लकळे,सचिव उमेश उर्फ बंड्या चव्हाण, खजिनदार उमेश बांदकर यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंड्या चव्हाण यांनी केले.