जैतापूर/राजन लाड:-राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांमधून मासे पकडण्यासाठी किंवा गरवण्यासाठी फावल्या वेळात अनेक जण समुद्रकिनारी जात असतात.
पाकाळे गावातील राहुल वामन राऊत याला गेल्या दोन दिवसात गर्वताना एकदा बारा फुट लांब, नऊ किलो वजनाची दांडोशी, तर आज किलो वजनाचा कोकेर मासा गळाला लागला.
राहुल मजुरीची कामे करून चा उदरनिर्वाह करत असतो. फावल्या वेळात संध्याकाळी कामावरून सुटल्यावर बाकाळे परिसरातील समुद्रा जवळच्या कड्यावर मासे गरवण्यासाठी जात असतो. माडबन बाकळे या भागात अनेक युवक लोखंडी रॉड म्हणजेच गरीच्या साह्याने मासेमारी करताना दिसतात. आज राहुल याला वीस किलो वजनाचा कोकेर मासा गळाला लागला. त्याने तो साखरी नाटे येथील विक्री केंद्रावर नेऊन विकला त्याला 180 रुपये किलोचा दर मिळाला आहे.
सध्या या परिसरात गरीला 20 किलो वजनाचा मिळालेल्या माशाची चर्चा सुरू असून कौतुक ही होत आहे.