सिंधुदुर्ग:-मसुरे मार्गाचीतड येथील जमिनीलगत असलेल्या विहिरीत पडून सुमारे १४ रानडुक्करांच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. आठ दिवसांनंतर विहिरीमध्ये दुर्गंधी सुटल्याने ग्रामस्थांनी पाहिले असता सदर घटना निदर्शनास आली.याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृत डुक्करांचे वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्याने त्याच विहिरीत दफन केले.
मसुरे मार्गाचीतड येथील जमिनीलगत असलेल्या विहिरीत पडून सुमारे १४ रानडुक्करांच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. आठ दिवसांनंतर विहिरीमध्ये दुर्गंधी सुटल्याने ग्रामस्थांनी पाहिले असता सदर घटना निदर्शनास आली.याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृत डुक्करांचे वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्याने त्याच विहिरीत दफन केले.