रस्ता लवकरात लवकर दुरुस्त न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा
फुणगुस/इकबाल पटेल:-फुणगुस मार्गे परचुरी रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता कित्येक वर्षे दुरूस्ती व डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत असून प्रवाशी व जनतेसह वाहनचालकांकडून सातत्याने ओरड सुरू सुरू आहे.
मात्र निवडणूक दरम्यान मतांसाठी आश्वासनाची खैरात मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना विसर पडत असल्यामुळेच येथील जीवघेणा प्रवास आजही कायम आहे.
फुणगूस येथून परचुरी तसेच मुंबई- गोवा (66) राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे या दोन गावांना जोडणारा व त्याच्या आसपास असणारे सुमारे पंधरा ते वीस गावांसाठी जवळचा मार्ग
वेळ व इंधन बचतीच्या हा रस्ता प्रवासासाठी महत्वाचा समजला जातो.फुणगूस येथून सुमारे सात कि.मी.च्या असलेल्या रस्त्यावर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती आहे,तर काही ठिकाणी उखडलेल्या रस्त्याची खडी व
दगड गोटे वर आले आहेत.फार दुर्दशा उखडलेल्या रस्त्यावर छोटे मोठे अपघातही होत असल्याने प्रवाशांसह
वाहनचालकानाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्याची दुरूसती व्हावी अशी सातत्याने प्रवाशी व जनतेतुन ओरड सुरू असून आता तरी लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देतील का? अशी विचारणा केली जात आहे.फुणगूस गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच
माहिती अधिकारी सक्रिय कार्यकर्ता
सुभाष लांजेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री महोदय उदयजी सामंत यांना दि.01/10/2023 रोजी लेखी निवेदन दिले आहे.फुणगूस परचुरी रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा तयारी केली आहे.