गुहागर/ उदय दणदणे:-गुहागर तालुक्यातील अडूर येथे समाजसेवक संतोष जैतापकर यांच्या मातोश्री निर्मला जैतापकर व संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीमचे गुहागर तालुका प्रमुख दिनेश झगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अडूर ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाले. यावेळी संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम व वालावलकर रुग्णालय, डेरवण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, हेदवी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.
या दरम्यान हर्निया, अल्सर, अपेंडीक्स, मूतखडा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मूळव्याध, चरबीच्या गाठी, महिलांची गर्भाशय तपासणी, जनरल, थॉयराईड यासारख्या एकूण २३ आजारांवर तपासणी केली गेली. या शिबीर दरम्यान साधारण रुग्ण १२० तर रक्तदाते ४० अशा एकूण १६० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच या शिबिराच्या मार्फत विविध प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांना मोफत उपचार केले जाणार आहे.
या शिबीर दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीमचे संस्थापक संतोष जैतापकर, चिपळूण शिवसेना तालुकाप्रमुख शरद शिगवण, गुहागर विधानसभा शिवसेना निरीक्षक उत्तेकर बंधू, अडूर ग्रामपंचायतच्या सरपंच शैलजा गुरव, उपसरपंच उमेश आरस व अन्य सदस्य, ग्रामसेवक श्री. खोत, माजी सरपंच अशोक देवळे, गुहागर नगरपरिषद माजी नगरसेवक संजय मालप, अडूर तंटामुक्त समिती अध्यक्ष विपुल नार्वेकर, दिनेश देवळे, डेरवण हॉस्पिटलचे रुग्णसेवक सचिन धुमाळ, हेदवी आरोग्य केंद्राचे नागवेकर मॅडम, अडूर उपकेंद्राचे श्री. पाटेदार, जि. परिषद शाळा अडूर भाटलेचे मुख्याध्यापक मोते सर, पत्रकार मयुरेश पाटणकर, दिनेश खेडेकर, जैतापकर वैद्यकीय टीमचे चिपळूण तालुकाप्रमुख सचिन घाणेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश खेडेकर यांनी केले.