संगलट ,खेड/ प्रतिनिधी:- रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक घोषित झाली असून ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी महापरिवर्तन सहकार आघाडी मैदानात उतरली आहे. महापरिवर्तन आघाडीच्या प्रचारासाठी लवेल येथे विभागीय मेळावा बेहरे कॉलेज येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी खेड तालुक्याचे उमेदवार राजेंद्र चांदिवडे तसेच जिल्हा उमेदवार दिपक मोने, संतोष कदम, अंकुश चांगण, प्रिया पवार, संतोष कांबळे उपस्थित होते. महापरिवर्तन आघाडीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव थोरात गट ) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट) शिक्षक समिती सहकार गट, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जुनी पेन्शन संघटना, दिव्यांग संघटना, उर्दू शिक्षक संघटना, केंद्रीय प्रमुख संघटना, शिक्षक मित्र गट संगमेश्वर, शिक्षक मित्र गट लांजा, शिक्षक भारती, पुरोगामी शिक्षक संघटना, प्रोटॉन संघटना या संघटना या महिपरिवर्तन आघाडीत आहेत. यावेळी होणाऱ्या मतदानातून महापरिवर्तन आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास नेते विलास गुजर, प्रकाश काजवे, पुरोगामीचे अध्यक्ष प्रदीप पवार, संघाचे विकास नलावडे, बाबाजी शिर्के, पतपेढीचे माजी अध्यक्ष विलास धामणे, संचालक संतोष उतेकर, चंद्रकांत खेडेकर, अजित भोसले यांनी व्यक्त केला.
या निवडणूकीत खेड तालुक्याचे उमेदवार म्हणून राजेंद्र चांदिवडे निवडणूक लढवत आहेत. चांदिवडे सध्या शिक्षक संघाचे अध्यक्ष असून त्यांचा लोक संपर्क चांगला आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. अतिशय संयमी आणि अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. तसेच मागील निवडणूकीत विजयी झालेले आणि गेली साडे सहा वर्षे खेड तालुक्याचे संचालक म्हणून काम केलेले संतोष उतेकर यांनी सर्व सभासदांना उत्तम सेवा दिली आहे. कोणत्याही सभासदाची अडचण होऊ दिली नाही. याचा देखील फायदा चांदिवडे यांना होणार आहे. त्यामुळे चांदिवडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गुजर यांनी केले तर पाटील यांनी आभार मानले. या मेळाव्यासाठी लवेल प्रभागातील सचिन गमरे, सुनिल तांबे , दिपक ओक ,संदीप तांबे, विनोद उतेकर, लक्ष्मण कोळी, पूजा वडके यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. मेळाव्यासाठी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.