गुहागर/ उदय दणदणे:-गुहागर तालुक्यातील सेवाभावी व्यक्तिमत्त्व समाजनेते संतोष जैतापकर यांची रुग्णसेवेत कार्यरत असणारी “संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम” व वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अडूर ग्रामपंचायत सभागृह, मु.अडुर ता.गुहागर येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात हर्निया,अल्सर,अपेंडिक्स,मुतखडा,टॉन्सिल्स,मोतीबिंदू शस्त्रक्रिया,मुळव्याध,चरबीच्या गाठी,कानाच्या पडद्याची तपासणी,प्रोस्टेट ग्रंथी,जनरल,पित्ताशयातील खडे,महिलांची गर्भाशय तपासणी,नाक,कान घसा,नाकाचा हाड वाढणे,हायड्रॉसेल,प्रोस्टेटग्रथी,फायब्रोडेनोमा,स्तनाचा कॅन्सर,तोडाचा कॅन्सर,थायरॉईड,महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया,इम्प्लांट रिमूव्हर,अशा विविध आजारांवर संबंधित सर्जन,अस्थीरोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, जनरल मेडिसीन,नाक,कान घसा यातील तज्ञ डॉक्टरांच्या वतीने विविध तपासणी व मार्गदर्शन लाभणार आहे.जास्तीत जास्त नागरीकांनी सदर आरोग्य तपासणी सेवेचा निःसंकोचपणे लाभ घ्यावा,तसेच तपासणी दरम्यान एखादा रुग्ण शस्त्रक्रिया करण्या योग्य आढळल्यास पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याने नागरिकांनी येताना आपले मुळ रेशनकार्ड,ओळखपत्र,जुने तपासणी रिपोर्ट घेऊन यावेत, अधिक माहितीसाठी रुग्णसेक दिनेश झगडे-९६७३८००५०७ मनोज डाफळे-९८८१११५८४३ दिनेश देवळे -९७६४३६६७७०
विपुल नार्वेकर-९७६४०४५५१२
निलेश घाणेकर-७८७५९८६८६१ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन समाजनेते संतोष जैतापकर यांनी केले आहे.