संगलट,खेड/प्रतिनिधी:-मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर येथील ग्रामस्थांनी दापोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून इथून पुढे गावाच्या विकासासाठी लागणाऱ्या कुठल्याही निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्द गावकऱ्यांना दिला व उपस्थित सर्वांशी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख श्री. प्रताप घोसाळकर, उपतालुकाप्रमुख हरिश्चन्द्र कोदेरे, विभागप्रमुख संजय शेडगे, विभागप्रमुख श्री. अनंत भाटये, युवासेनेचे जिल्हा अधिकारी . चेतन साटोपे, तालुका सचिव श्री. सिद्धेश देशपांडे, देव्हारे ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. ऐसावरे, युवासेना तालुका अधिकारी श्री. निलेश मोरे, युवासेना उप तालुकाप्रमुख श्री. शैलेश वाजे, गणविभाग अधिकारी श्री. बद्रुद्दीन उंडरे, युवासेना उप गणअधिकारी श्री. किरण, शिरगांवचे विभागप्रमुख श्री. इरफान बुरोंडकर आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.