रत्नागिरी:-चिपळूण-रत्नागिरी मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार एसटीच्या मर्यादित थांबे बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीकडून करण्यात येत आहे.
मर्यादित थांबे घेणाऱ्या चिपळूण-रत्नागिरी बस फेऱ्यांचे वेळापत्रक असे – सकाळी ७.१५, सकाळी ८.००, दुपारी २, दुपारी अडीच. रत्नागिरी-चिपळूण बसफेऱ्यांचे वेळापत्रक असे – सकाळी १०.१५ रत्नागिरी बोरिवली, सकाळी ११.१५ रत्नागिरी स्वारगेट पुणे, सायंकाळी ५.१५, सायंकाळी ५.४५.
यासोबतच पूर्वीप्रमाणेच चिपळूण रत्नागिरी आणि रत्नागिरी चिपळूण ‘वन स्टॉप’ फेरी सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
चिपळूण-रत्नागिरी मर्यादित थांब्यांच्या एसटी बसफेऱ्या सुरू
