चिपळूण:-रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदी चिपळूणचे साजिद भाई सरगुरो यांची निवड झाली आहे.
श्री. सरगुरोह यांनी लहान वयात राजकारणात प्रवेश करत नावलौकिक मिळविला आहे.
काँग्रेस पक्षातून चिपळूणमध्ये काम करीत असताना त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. पक्षवाढीसाठी ते प्रयत्न करत आहेत. त्याच कामाची पोचपावती म्हणून काँग्रेसचे युथ अध्यक्ष कुणाल राऊत यांनी त्यांची रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड केली आहे.
रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदी साजिदभाई सरगुरोह
