आयुष्यमान कार्ड ,जनधन बँक अकाउंट आणि प्रधानमंत्री जीवनज्योती आणि जीवन सुरक्षा विमा काढण्याचेही शिबिर
राजापूर:-राजापूर तालुक्यातील अणसुरे दुर्गा माता प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो .
यावर्षी मंडळाचे रोप्य महोत्सवी वर्ष आहे यानिमित्त विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्गामाता प्रतिष्ठानने चैतन्य संस्था प्रेरित त्रिवेणी संघाच्या सहकार्याने रत्नागिरी येथील रामनाथ हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे तसेच आयुष्यमान योजनेअंतर्गत कार्ड काढून देणे, युनियन बँक ऑफ इंडियाच्या बँक मित्रांच्या माध्यमातून जनधन योजनेअंतर्गत नवीन बँक पासबुक काढणे आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत विभाग काढण्याचे शिबिर घेण्यात आले.
या शिबिराला अणसुरे आणि परिसरातील सुमारे दीडशे ते दोनशे ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.
या शिबिरामध्ये सामन्य तपासणी बरोबरच, ब्लड शुगर, इसीजी आणि अन्य तपासण्या करण्यात आल्या.
तर जवळपास 60 लोकांना आयुष्यमान योजनेअंतर्गत कार्ड काढून देण्यात आली.
जनधन योजनेअंतर्गत अनेकांची बँक खाते आणि विमाही काढण्यात आले.
या शिबिराला रामनाथ हॉस्पिटलचे डॉ. लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुमित कसालकर, डॉ.अक्षय निर्मल, डॉ. कोमल हुले, आरोग्यमित्र प्रणित पवार, आशिष गावडे, सिस्टर समरीन मुजावर ,प्रमोदिनी पवार, त्रिवेणी संघाच्या सहसचिव रेशम लाड , संघ पदाधिकारी दीक्षा वाडेकर, सावित्री गाव समिती अध्यक्ष नमिता घाडी, त्रिवेणी संघाचे व्यवस्थापक राजन लाड, कार्यकर्ता प्रतिभा मोहिते आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दुर्गा माता प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश सावंत उपाध्यक्ष मंगेश कणेरी, अनसुरे सरपंच तथा मंडळाचे सचिव रामा कनेरी, खजिनदार दीपक वाडेकर, सदस्य जयवंत वाडेकर, सल्लागार विभाकर गाडगीळ,यांसह सदस्य
उमेश सावंत, अशोक सावंत, दीपक लिंगायत, संजय दांडेकर, वसंत तुळपुळे, संकेत वाडेकर किशोर कणेरी, लहू चव्हाण, योगेश कणेरी, मोहन कणेरी आदींसह मंडळाचे सर्व सदस्यांनी मेहनत घेतली