दोषींवर कारवाई करण्याची स्थानिकांनी केली मागणी
चिपळूण/ओंकार रेळेकर:-आज राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी आज चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देऊन, मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. नवीन पूल कोसळणं ही दुर्देवी घटना आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी सांगितले.

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे काल कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणीची आज पालकमंत्री रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे,चिपळूण प्रांत, संबंधित अधिकारी उपस्थित होते. चिपळूण मधील ही घटना गांभीर्याने घेऊन चांगल्या दर्जाचे काम करणे गरजेचे आहे. यावेळी स्थानिकांनी संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली.घडलेळ्या अपघातत मोठी हानी झाली नाही हे आपले भाग्य
आहे.सदरील विषयाची कसून चौकशी केली जाईल असे सांगण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी स्थानिक लोकांशी ही संवाद साधून हकीगत जाणून घेतली.