चिपळूण:- शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय खरवते दहिवली येथे जागतिक अन्नदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जागतिक अन्नदिनाचे ओचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
यामध्ये अन्नतंत्रज्ञान व कृषि शाखेच्या विद्यार्थ्यांकडून बनवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण अन्नपदार्थांचे व पोस्टर्सचे प्रदर्शन ई.चा समावेश होता.या कार्यक्रमास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी लाभले.आमदार शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांकडून बनवण्यात आलेल्या पदार्थांच्या स्टाॅलला भेट देवुन विद्यार्थ्यांकडून बनवण्यात आलेल्या पदार्थांची माहीती घेतली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले नाविन्यपूर्ण पदार्थ बनवुन त्यांची विक्री उत्तमरित्या कशी करता येईल? याविषयी अभ्यास करण्याच्या सुचनाही आमदार शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रमेश राणे, स्व.गोविंदरावजी निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेचे उपप्राचार्य विजय चव्हाण, एम.सी.व्ही. सी विभाग प्रमुख प्रा.सलीम मोडक आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अन्नतंत्रज्ञान व कृषी शाखेचे सर्व प्राध्यापक व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, खरवते दहिवली येथे जागतिक अन्नदिन उत्साहात
