सांगली येथे होणाऱ्या विभागीय शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धेसाठी मुलांची निवड
चिपळूण/ओंकार रेळेकर:-अल्पावधीतच संपूर्ण चिपळूणमध्ये लोकप्रिय झालेल्या कापसाळ गावी निसर्ग रम्य वातावरणात वसलेल्या एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्क्वॅश रॅकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करून शाळेचे नाव उंचावले आहे.सांगली येथे होणाऱ्या विभागीय शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धेसाठी या मुलांची निवड झाली आहे.एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन सौ.सायली अमोल भोजने आणि अँड.अमोल चंद्रकांत भोजने यांनी या मुलांचे विशेष अभिनंदन केले आहे.
क्रिडा व युवक सेवा संचालनाय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी स्क्वॅश रॅकेट असोशियशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय स्क्वॅश रॅकेट स्पर्धा दिनांक ०६ ऑक्टो. २०२३ व ०७ ऑक्टो. २०२३ रोजी यश इंग्लिश अकॅडमी चिपळूण येथे सकाळी १० ते साय.५ पर्यंत संपन्न झाल्या. सदरच्या स्पर्धेमध्ये एसीबी इंटरनॅशनल स्कूल. कापसाळ
येथील मुलांनी नेत्रदीपक कामगिरी करीत यश संपादन केले.प्रशालेतून १० मुले व १ मुलगी यांनी सहभाग घेतला होता. या मधून सम्यक गमरे, पार्थ काष्टे, मयंक राऊत, निशांत जाधव व निधी जाधव यांची दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ व १० ऑक्टोबर २०२३ रोजी आमराई ऑफिसर क्लब, सांगली येथे होणाऱ्या विभागीय शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर विभागीय शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धेमध्ये कोल्हापूर मनपा, सांगली मनपा,सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जिल्हास्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त ३५ मुले व ३५ मुली अश्या एकूण ७० खेळांडूनी सहभाग नोंदवला. सदरच्या विभागीय शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धेत एसीबी इंटरनॅशनल स्कूल. कापसाळ प्रशालेतील सम्यक गमरे व निधी जाधव हे दोन खेळाडू उपांत्य फेरीपर्यंत पोहचले व त्यांची राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धेसाठी निवड झाली, कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पालक प्रतिनिधी श्री. अभिजित जाधव आणि क्रीडा शिक्षक मनीष काणेकर उपस्थित होते. सर्व मुलांना आणणे, नेणे, राहण्याची, जेवणाची सोय जाधव यांनी बघितली.स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या मुलांचे एसीबी इंटरनॅशनल स्कूल मधील सर्व संचालक शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.स्क्वॅश रॅकेट स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या मुलांचे अभिनंदन
करतांना चेअरमन सायली भोजने,अँड.अमोल भोजने.
गुणवत्ता अधिकारी नेहा महाडिक , मुख्याध्यापक राकेश भूरण,पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे,क्रीडा शिक्षक मनीष काणेकर आदी मान्यवर मंडळींनी या मुलांचे अभिनंदन केले आहे.
फोटो : स्क्वॅश रॅकेट स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या मुलांचे अभिनंदन करतांना चेअरमन सायली भोजने,अँड.अमोल भोजने.गुणवत्ता अधिकारी नेहा महाडिक आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहे(छाया : ओंकार रेळेकर)
एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची स्क्वॅश रॅकेट स्पर्धेत दमदार कामगिरी
