चिपळूण/ओंकार रेळेकर: येथील खेर्डी मोहल्ल्यामधील
सेवाभावी व्यक्तीमत्त्व, तालुका चिपळूण पूर्वविभागात मैनूभाय जेवणी म्हणून प्रख्यात असलेले मैनुद्दीन अ.गफूर चौगुले यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्रधक्याने नुकतेच निधन झाले. ते६३ वर्षाचे होते. युवक काँग्रेसचे संरचिटणीस मुनव्वर चौगुले याचे ते वडील होते.
मैनुद्दीन चौगुले अतिशय प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे होते. गरीब असो श्रीमंत असो, त्यांचेकडील बरशे, वाढदिवस आदी छोटेखानी कार्यक्रम ते मोठ्या लग्न समारंभामध्ये मैनूभाय जेवणी हे पैशाची परवा न करता सर्वांकडे जेवण बनवायला असण्याचे नित्याचे झाले होते. मंडपात जेवणारे लोकांमधून ५/२५ लोक जेवणाचा आस्वाद घेतांना मैनूभायनी जेवण बनवलेले आहे असे आत्मविश्वासाने बोलत असत. ते ही सेवा करता करता आपला छोटामोठा मच्छीव्यवसायही अगदी प्रमाणिकपणे करत. त्यांचे थोरले बंधू उत्कृष्ट सनईवादक व सुप्रसिध्द लेखक यासीनभाई चौगुले
यांचे फेब्रुवारी महिन्यात निधन झाले होते.
सहा महिन्यात चौगुले कुटुंबियावर हा दु:खाचा दुसरा डोंगर
कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुनव्वर, दोन मुली, जावई, तीन भाऊ आदम, इस्हाक, अबू, दोन बहीणी असा मोठा परिवार आहे.