चिपळूण/ओंकार रेळेकर- मुंबई गोवा महामार्गाबाबत आमची व नितीन गडकरी यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक झाली त्याची आठवण आज झाली. कोकण एक्सप्रेसशी बोलताना त्यांनी ती सांगितली….. रस्त्यांच्या कामावरून बैठकीत बरीच गरमागरमी झाली. त्यामुळे नितीन गडकरी बैठक सोडून निघून जात होते, तेवढ्यात मी त्यांना विनंती केली की, आपण आता गेलात तर पुढे बैठक होण्याची शक्यता नाही व हायवेच्या कामावर काहीच प्रगती होणार नाही ते परत आले व बसले. त्यानंतर मी त्यांना एक प्रस्ताव दिला की, जो हायवे शहरातून म्हणजे बहादूरशेख मार्गे जाणार आहे, तोच हायवे आपण कापसाळ मार्गे वळवला तर बरेच काही सकारात्मक व योग्य पद्धतीने घडेल.
गडकरींना त्या क्षणी ही कल्पना खूपच आवडली व त्यांनी मला टाळी दिली व त्यांनी अधिकारी वर्गालाही याबाबत विचारले की, तुम्ही मला का सांगितलं नाहीत?ते विरोधी पक्षाचे आहेत म्हणून तुम्ही बोलला नाहीत का ?असेही बोलत अधिकारी वर्गाला धारेवर धरले. परंतु पुढे काय घडले माहित नाही. गडकरींना जी माझी सूचना पटली होती आजच्या घडीला अमंलात आणली गेली असती व त्या पद्धतीने जर मार्ग झाला असता तर हा रस्ताही वेळेत पूर्ण झालास का व आजच्या दुर्घटनेचा घडण्याचा प्रश्नच आला नसता. परंतु आहे तोच मार्गाने आत्ताचा रस्ता झालेला आहे.
पण त्यानंतरही मी पुन्हा पूल हा केबल्सवर ओढावा म्हणजे अधिक् सुरक्षित होईल. तीही सूचना सगळ्यांनाच पटली होती. म्हणजे, मुंबईमध्ये असलेला बांद्रा सिलिंग प्रमाणेच या पुलाल केबल जोडावे अशी माझी सूचना होती परंतु तीही अमंलात आणली गेली नाही त्यावर जर काम झाले असते तर आजचा प्रसंग घडला नसता. बहादूरशेखजवळ चा वाशिष्ठी वरचा एका बाजूचा पूल वगळता पूर्ण जिल्ह्यामध्ये एकही पुलाचे काम व्यवस्थित झालेले नाही हेही गोष्ट नमूद करण्यासारखे आहे याकडेही आमदार शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले कामाचं ऑडिट ही गोष्ट फार दूरची आहे. पण कामांमध्ये लक्ष ठेवायलाही कोणतीही यंत्रणा सक्षमपणे काम करत नाही व त्याचाच आजचा हा परिणाम आहे. या निमित्ताने गडकरी यांना पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की, हेलिकॉप्टर पेक्षाही आपण बायरोड येऊन संपूर्ण रस्त्याची पाहणी करावी. आपण म्हणाला होतात की मला कोकणातल्या रस्त्यावर पुस्तक लिहायला पाहिजे. परंतु त्याआधी आपण ही पाहणी केल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून येतील आणि वस्तुस्थिती ही कळेल त्यानंतरच आपण पुस्तकाच्या निर्णयाप्रत यावे.