राजापूर:-विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन..
जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम महाराष्ट्र चे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा राजापूर तालुक्यातील नाटे नगर विद्या मंदिर च्या पटांगणात संपन्न झाला.
सकाळी साडेदहा वाजता फिशरीज हायस्कूल नाटे येथून बाजारपेठ मार्गे शोभा यात्रेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध देखावे साकारण्यात आले होते. तर अनेक महिला पारंपारिक वेशभूषा करून कलश घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. नाटे नगर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या माध्यमातून यामध्ये सहभाग घेतला होता.
या शोभायात्रेच्या माध्यमातून भव्य प्रभात फेरी ते हायस्कूलच्या पटांगणावर दाखल झाल्यानंतर स्वामींच्या पादुकांचे विधीवत रंगमंचावर आगमन झाले. त्यानंतर गुहागर येथील एका सेवक दाम्पत्याच्या वतीने स्वामींच्या पादुका पूजन सोहळा संपन्न झाला. याचवेळी शेकडो भक्तांनीही या पूजन सोहळ्यात सहभाग नोंदवला.
या सोहळ्या दरम्यान राजापूर तालुक्यातील विविध गरजू लोकांना घरघंटी, शितपेट्या, ग्रास कटर आधी साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अजित यशवंतराव, नाटे सरपंच संदीप बांदकर, साखर नाटे सरपंच श्रीमती गोवळकर, संघाचे अध्यक्ष रमेश लांजेकर, नाट्य हायस्कूलचे शिक्षक करे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
स्व स्वरूप संप्रदाय रत्नागिरी च्या वतीने सर्व मान्यवरांचा व उपस्थितितांचा सत्कार करण्यात आला.
धार्मिक विधी व आरती संपन्न झाल्यानंतर प्रवचनाचा आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून शेकडो भक्त सहभागी झाले होते.
राजापूर तालुका सेवा केंद्र आणि स्व स्वरूप संप्रदाय रत्नागिरी जिल्हा यांनी नाणीजधाम पिठाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.