आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती
खेड:-महाराष्ट्रातील धनगर समाजाला ST आरक्षण मिळावे यासाठी मागील अनेक वर्षांपासून धनगर समाज संघर्ष करत आहे. सध्या हा विषय संपूर्ण महाराष्ट्रात तापला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज आक्रमक होऊन सरकारला जागे करण्यासाठी विविध स्तरावर रस्त्यावरील व न्यायालयीन लढाई लढत आहे.
धनगर समाजाचे महाराष्ट्रातील डॅशिंग व आक्रमक नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब धनगर आरक्षण जागर यात्रेच्या माध्यमातून आरक्षणाची भुमिका धनगर समाजाला समजून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात झंझावाती दौरा करत आहेत.या धनगर आरक्षण जागर यात्रेनिमित्त, सकल धनगर समाज, रत्नागिरी यांच्या वतीने वार मंगळवार दिनांक १७/१०/२०२३ खेड तालुका,गांव भरणे येथील गणेश मंगळ कार्यालयात दुपारी ठिक १ वा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या धनगर आरक्षण जागर यात्रेनिमित्त संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील धनगर समाजाचे अनेक युवा कार्यकर्ते धनगर आरक्षण जागर यात्रेची खेड ची सभा यशस्वी करण्यासाठी काम करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी धनगर आरक्षण जागर सभेला बहुसंख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन धनगर समाजाचे युवा नेते मंगेश बाबाजी गोरे व प्रशांत कोंडीराम आखाडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी
मंगेश बाबाजी गोरे – 7083834991,प्रशांत कोंडीराम आखाडे- 7745056557 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.